बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

 



शिरूर तालुक्यातील बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून बुधवारी एका तरुणीवर बिबट्याने हल्ला केला 




शिरूर तालुक्यातील बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून बुधवारी एका तरुणीवर बिबट्याने हल्ला केला.


 हल्ल्यामध्ये जाबुंत गावातील पूजा नरवडे (वय १९) यांचा मृत्यू झाला. मात्र, बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले नाही. परिसरात पिंजेरे लावले आहेत. गावामध्ये आणखी बिबटे असण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

 जाबुंत गावात घरासमोर काम करत असताना नरवडे यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला. यामध्ये नरवडे यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत वनविभागाला माहिती कळताच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत बिबट्या पसार झाला होता.

         शिवारामध्ये विविध ठिकाणी पिंजरे लावण्याची मागणी करण्यात आली आहे. महिन्यापूर्वी पारनेरमधील पाडळी आळे गावातील एका विहिरीमध्ये बिबट्या शिकार घेऊन पडला होता. या विहिरीमधून बिबट्याला काढताना नागरिकांच्या गोंधळामुळे बिबट्याने पिंजऱ्यात जाण्याऐवजी विहिरीच्या बाहेर उडी घेतली. त्यामध्ये बी. ए. चव्हाण जखमी झाले होते. निसटलेला बिबट्या शेजारीच असलेल्या दुसऱ्या विहिरीत पडला होता. अथक परिश्रमानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते. परिसरात दोन ते तीन बिबट्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Comments